Sunday, February 21, 2010

Cold Fingers!

This one was clicked in December 2007 at Lake Tahoe, California

Thursday, November 5, 2009

Candle Light Darkness!



बोलता बोलता लाईट जावी,
बराच वेळ दबून राहीलेले भाव चक्क सरळ ओघळून चेहऱ्यावर यावेत,
अवाक होऊन कळोखावर नजर खिळावी,
मेणबत्ती मिळेपर्यंत हा खेळ असाच चालू रहावा,
आणि मग काडीचा जसा कण नी कण मंद आवाज करत पेट घेतो,
तसा सगळा चेहऱ्यावर ओघळलेला भाव, जशी वाळू हातातून निसटते तसा एखाद्या हलक्या हुंकारात निसटून जावा!



फक्त फोटोबद्दल बोलायचं तर, अंधारामधे फोटोचे फार कमी प्रयत्न केलेत, पण काही खास ट्रिक्स असतील, तर जरूर ऐकायला आवडेल. हा एक सहज जमून गेलेला प्रकार. MSEB चे धन्यवाद.

Tuesday, March 31, 2009

Hope

Friday, October 31, 2008

Assassin's Creed

एका ओब्सेस्ड गेमर चा फोटो.
तशी थोडी भेसळ आहे फोटो मधे ... म्हणजे रंगीत होता ... त्याला नंतर ब्लॅक/व्हाईट केला ... डिजीटली प्रोसेस्ड. :)
Posted by Picasa

Wednesday, October 29, 2008

Yeah ... Bring it on ...




at Half Moon Bay (California)
Posted by Picasa

Thursday, April 3, 2008

भाव ...

(Copyrights च्या भानगडीमुळे मागचा फोटो काढावा लागला ...
हा नवा स्टॉक.)

हॉलीवूडच्या साईनच्या पुढे पोज देणारी ही मुलगी ... (हॉलीवूड साईनच्या फोटोमधे काही फारशी मजा नाही आली ... म्हणून तो नाही लावत आहे!)


पुढचे २ फोटो डिस्ने मधले ... दोघीही एकदम out of the world. दोघींच्याही चेहऱयावरचे भाव अप्रतीम!! कॅमेराच्या १२ x झूमचा पुरेपुर वापर. ईथे म्हणे लोकाना आवडत नाही बीन विचारता फोटो काढायला. आणि सांगून असे फोटो येत नाहीत. म्हणून ऊगाच कॅमेरा डोळ्याला लावून फिरावे लागले. तिकडे तिने मान वळवली आणि ईकडे मी फोटो काढला.आणि हा एक. विलक्षण काहीतरी भाव आहेत यात.

झूम कॅमेरा झिंदाबाद!

आणखीही काही आहेत ... करेन लवकरच पोस्ट

Wednesday, December 5, 2007

Twin Photos

कधी फोटोचा जुडवा पाह्यलाय का?

काही वर्षांपुर्वी जकर्तामधल्या अंचोल बीच वर एक मस्त फोटो काढलेला ...

परवा एकदम तसाच सीन परत दिसला ...! असा की वाटावे ये शायद पेहले देखा है ... शायद पिछले जनम मे!! हा दुसरा फोटो सॅनफ्रान्सीस्को मधला ... पीअर ३९ वरून घेतलेला.


एकदम पुरानी यादे ताजा करणारा फोटो. का कोणास ठाऊक पण दोनही फोटो ऊगाचच गंभीर वाटतात.