Thursday, November 5, 2009

Candle Light Darkness!बोलता बोलता लाईट जावी,
बराच वेळ दबून राहीलेले भाव चक्क सरळ ओघळून चेहऱ्यावर यावेत,
अवाक होऊन कळोखावर नजर खिळावी,
मेणबत्ती मिळेपर्यंत हा खेळ असाच चालू रहावा,
आणि मग काडीचा जसा कण नी कण मंद आवाज करत पेट घेतो,
तसा सगळा चेहऱ्यावर ओघळलेला भाव, जशी वाळू हातातून निसटते तसा एखाद्या हलक्या हुंकारात निसटून जावा!फक्त फोटोबद्दल बोलायचं तर, अंधारामधे फोटोचे फार कमी प्रयत्न केलेत, पण काही खास ट्रिक्स असतील, तर जरूर ऐकायला आवडेल. हा एक सहज जमून गेलेला प्रकार. MSEB चे धन्यवाद.